Uunchai Movie Review

Bollywood Movie Review

Uunchai 

नमस्कार मित्रांनो!

तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत!

मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत 'ऊंचाई' हा चित्रपट मला कसा वाटला ते शेअर करणार आहे.

दोस्तहो, ह्या चित्रपटाने थिएटर मध्ये खेचून नेण्याची प्रमुख दोन कारणं होती. पहिलं म्हणजे अमिताभ बच्चन, अनुपम खेर, आणि बबन इराणी ह्या तीन लेजेंड्स ना एकत्र एका स्क्रीनवर बघायला कोणत्या रसिक प्रेक्षकाला आवडणार नाही? आणि दुसरं कारण म्हणजे ट्रेकिंग. मला ट्रेकिंग करायची प्रचंड आवड आहे. त्यात तीन वयस्क ट्रेकिंग करणार, ते ही माऊंट एवरेस्ट म्हणजे पाहणाऱ्यासाठी नक्कीच एक वेगळा अनुभव असणार यात काही न्हवता. आणि अजून एक तिसरं कारण सुद्धा आहे. ते म्हणजे हा चित्रपट 'मैत्री' वर आधारित आहे.

तर मित्रांनो, या दोन कारणांशीवाय पण अनेक कारणं आहेत की ज्यामुळे मला 'उंचाई' हा चित्रपट आवडला. आज पर्यंत बॉलीवुड मध्ये ट्रेकिंग+फ्रेंडशिप या थीम वर आधारित चित्रपट बनले नाहीत असं नाही. अनेक चित्रपट चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील. परंतु, उंचाई हा चित्रपटात फ्रेंडशिप+ट्रेकिंग+म्हातारपण या थीम वर आधारित आहे. आहे न काही तरी नवीन ?

उंचाई या चित्रपटाची स्टोरी अशी आहे की चार वयस्कर मित्र असतात. एक फार श्रीमंत परंतु चांगला राजकारणी असतो, दूसरा लेखक असतो, तिसरा मित्र एका नामांकित पुस्तक दुकानाचा मालक असतो, आणि चौथा मित्र, त्याचं फॅशन डिझाईन चं बुटीक असतं.

राजकारणी मित्राची फार इच्छा असते की एकत्र सर्वांनी माऊंट एवरेस्ट च्या बेस पॉइंट पर्यंत ट्रेकिंगला जायचं. तो मित्र बाकीच्या तिन्ही मित्रांना स्वतःच्या बर्थडे पार्टीला बोलवतो. सगळे एंजॉय करतात. आणि जाताना तो त्याची ट्रेकिंगची इच्छा सर्वांना सांगतो. ज्या वेळी इच्छा सांगतो त्यावेळी कोणी त्याचं बोलणं सीरियसली घेत नाही. तिघेही वयाचं, हेल्थचं, ई. कारणं देऊन निघून जातात. आणि दुसऱ्या दिवशी एक शोकिंग न्यूज कळते की ज्या मित्राच्या बर्थडेला काल गेले होते त्या मित्राचा मध्यरात्री अटॅक मुळे मृत्यू होतो. त्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करायची म्हणून अमिताभ बच्चन बाकी दोन मित्रांना तयार करतो. पण ते दोन्ही मित्र इतक्या सहजासहजी तयार होत नाहीत. त्यांना मानवण्यासाठी बच्चन सरांना बरेच कष्ट घ्यावे लागतात. कसे बसे तयार होतात. प्रवास सुरू होतो. आता प्रवास म्हंटलं की मजा मस्ती आली. परंतु, प्रत्येक नाण्याच्या ज्याप्रमाणे दोन बाजू असतात. तसंच प्रवासाचं पण असतं. मजा-मस्ती बरोबरच प्रवासात त्यांना काही प्रॉब्लेम्स पण येतात. आपल्या म्हटरपणी सुद्धा येतील असे काही पर्सनल तर काही फॅमिली प्रॉब्लेम्स ना सामोरे जावं लागतं. हा प्रवास संपला की लगेच ट्रेकिंग चालू होतं. अर्थात वयस्कर मंडळी मॉऊंट एवरेस्ट सारख्या जगातील सर्वात उंच शिखराच्या नुसतं बेस पॉइंट ला जाणं म्हणजे पण काही ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही ते. त्यासाठी प्रचंड धाडस लागतं. आणि तिन्ही मित्रांनी धाडस केलं ते फक्त आणि फक्त आपल्या मित्राच्या शेवटच्या इच्छेखातीर! इसे कहते आखरी दम तक दोस्ती निभाना!

पुढे ट्रेकिंग करताना त्यांना काय-काय प्रॉब्लेम्स येतात आणि ते तिघे माऊंट एवरेस्ट च्या बेसमेंट पर्यन्त पोहचतात की नाही ? या शिवाय ज्या मित्रासाठी ट्रेकिंग त्याच्या विषयी आणखीन एक रहस्य त्यांना कळतं. तर ते रहस्य जाणून घेण्यासाठी 'उंचाई' चित्रपट नक्की पहा. 

तर मित्रांनो 'धन्यवाद ! शुक्रिया ! आभार ! अँड थँक यु Friends ! तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.

Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -

Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या