'वपूर्वाई' पुस्तकातील सुंदर क्योट्स'

'वपूर्वाई' पुस्तकातील सुंदर क्योट्स'

वपूर्वाई - व.पु. काळे 

  • ज्यांच्या जागा प्रशस्त आहेत, त्यांची मनं प्रशस्त नाहीयेत, आणि ज्यांची मनं प्रशस्त आहेत, त्यांच्या जागा लहान आहेत.
  • कितीही म्हंटलं की मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येत नाहीत, कारण मनाच्या कमकुवतपणापायी निर्माण केलेलं दुःख कुठलं आणि दुःखावर उभं राहिलेलीन दुःख कुठलं हे जोवर ठरविता येत नाही तोपर्यंत नाही बोलता येत.
  • एखादा बदल कोणत्याही प्राण्यांवर जबरदस्तीनं लादला गेला की लोकांना जरी बदल पाहून आनंद होत असला तरी आतून ती व्यक्ति संपूर्ण उद्ध्वस्त झालेली असते.
  • प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं एक जग असतं. ते उद्ध्वस्त होऊ नये ही त्यांची धडपड. जे बाहेरचं जग मानतात ते आतून फुटतात. जे बाहेरचे जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल म्हणतात ते सुखी.
  • न्यायदेवता आंधळी असते. तिनं डोळ्यांवर जी पट्टी बांधून घेतलेली आहे, ती तिनं इतरांच्या डोळ्यांवरून काढून घेतलेली आहे.
  • दुःखाला एक चेहरा असतो. सुखाला अनेक असतात.
  • उन्हातान्हात राबणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही वाईट वाटलं तरी स्वतःची जागा सोडून ते सावलीचा वर्षाव करीत माणसाच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडाच्या सावलीला आणि औदार्याला एकाच जागेचा शाप असतो.
  • भूतकाळातल्या आठवणींना सगुण साकारत्व असतं तर स्वप्न नेहमीच निराकार निर्गुण असतात.
  • प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितकं प्रेम जास्त. आकर्षणाला एक सेकंडाचा सहवास पुरेसा असतो. म्हणूनच आकर्षणाचं अस्तित्व काही सेकंदापुरतंच असतं.
  • वर्तमानपत्रवाल्यांना 'बलात्कार' झाला एवढं सत्य चालत नाही, ह्यातलं दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यांना फक्त 'सनसनाटी'पणा हवा असतो.
  • भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगेही भ्रमण करीत नाहीत. फूलणं हा कमळाचा धर्म असतो आणि रसिकता हा भुंग्याचा स्वभाव असतो.
  • जेव्हा एखादा संसार अर्ध्यावर टाकून जातो तेव्हा दोघांपैकी एका व्यक्तिचं आयुष्य संपतं, तर मागे उरतो त्याचा संसार संपतो. 
  • सुरक्षितपणाच्या भावणेसाठी कसली ना कसली किंमत मोजायला लावतो त्याला संसार म्हणतात.
  • जगज्जेते असे पाच बलाढ्य नवरे जरी हयात असले. तरी द्रौपदीचा कृष्ण कुणी निराळाच असतो.
  • सुखं इतकी दुर्मिळ व्हायला लागली आहेत की गाडीत हल्ली बसायला जरी जागा मिळाली तरी काहीतरी पुण्य केलं असावं मागच्या जन्मी असं वाटतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या