सर्व रसिक वाचकांना सप्रेम नमस्कार!
मी आकाश राहुल कोठाडिया. मला वाचनाची आवड आहे. विविध कादंबऱ्या, कथासंग्रह, वैचारिक, इ पुस्तकं मला वाचायला आवडतात. कधी लिहावंसं वाटलं, म्हणजे सुचलंच तर कविता, कथा, व लेख लिहितो. तसेच, akashvaanee या ब्लॉग च्या मदतीने मराठी पुस्तकांबद्दल मला जे वाटतं, जे उमजतं, ते - ते सर्व तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
आपण वाचन करत असताना, आपल्यासमोर एक प्रश्न नेहमी उभा असतो, तो म्हणजे - वाचनासाठी पुढचं पुस्तक कोणतं निवडावं ? खरं तर, आपल्याकडे अनेक पर्याय असतात पण त्यातून नेमकं कोणतं पुस्तक वाचायला घ्यावं हे मात्र शेवटपर्यंत ठरत नसतं. बरोबर ना ? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्व वाचकांना लगेच मिळावं, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन मी Akashvaanee हा ब्लॉग तयार केलेला आहे.
akashvaanee.blogspot.com हा blog खास पुस्तकांसंबंधीत माहिती देणारा आहे, हे तर तुम्हाला समजलंच आहे. या ब्लॉग वर, आजपर्यंत मी वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहीत आहे व या पुढे ही लिहिणार आहे. एखादं पुस्तक वाचताना मला काय वाटलं, त्यावेळी माझ्या मनात काय विचार आले, त्या पुस्तकातून मला कोणती शिकवण मिळाली, हे सर्व मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या ब्लॉग पोस्ट वरील अनुभव वाचून तुम्हाला देखील अनेक पुस्तकांबद्दल माहिती होईल व नवनवीन पुस्तकांची ओळख होईल. त्याचबरोबर, पुस्तकाचे लेखक, प्रकाशक, किंमत, इ. माहिती देखील मी या ब्लॉग वर देतो आहे, जेणेकरून तुम्हाला पुस्तक विकत घेताना सोपं जाईल.
मी वर म्हटल्याप्रमाणे, akashvaanee हा ब्लॉग तुम्हाला 'पुढचं पुस्तक निवडण्यासाठी' नक्की मदत करेल, अशी आशा करतो. मी पोस्ट केलेल्या एखाद्या पुस्तकाच्या समीक्षे विषयी तुमचा काही वेगळा अनुभव किंवा विचार असेल, तर तो तुम्ही कंमेंट्स च्या मदतीने माझ्यासोबत शेअर करा किंवा akashkothadia20@gmail.com यावर मेल करू शकता. माझ्या पोस्ट तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या इतर वाचक मित्रांबरोबर शेअर करा. तुमच्यासाठी मी मराठी पुस्तकांविषयी अधिकाधिक माहिती घेऊन येणार आहे. So, Stay Connected with me.
तुमच्या कडून मिळालेल्या प्रेमाबद्दल व प्रतिसादाबद्दल सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार !! खूप खूप धन्यवाद !!
आपला मित्र
आकाश राहुल कोठाडिया