Panghrun Marathi Movie Review

(पांघरून चित्रपटाचे छायाचित्र)

Marathi Movie Review
पांघरून: पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी!

Hello Friends!

तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत!

मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरून' हा चित्रपट मला कसा वाटला ते शेअर करणार आहे.

तर दोस्तहो, 'पांघरून - पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नायक व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. पांघरून हा चित्रपट बा भ बोरकर यांच्या कादंबरीवर आधारित असून, या चित्रपटात मराठी रंगभूमी वरील अनेक सुप्रसिद्ध नायकांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

(पांघरून चित्रपटातील नायक - अंतु भटजी)

पांघरून हा चित्रपट आपल्याला १९ व्या शतकाच्या सुरुवातीला नेतो. जेव्हा नुकतंच विधवा स्त्रियांना दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली गेली होती. तसेच पांघरून हा चित्रपट आपल्याला नयनरम्य कोकण व गोव्याचे आणि तिथल्या हिरवळीचे दर्शन घडवतो. या चित्रपटात अमोल बावडेकर यांनी नायकाची म्हंजेजच 'अंतू भटजी' ची भूमिका साकारली आहे. अंतू भटजी यांची बायको - जानकी (मेधा मांजरेकर) अचानक वारते. अंतू भटजींना जानकीपासून २ लहान मुली असतात.

(पांघरून चित्रपटातील राधाक्का)

अंतु भटजीच्या घरा शेजारी राधाक्का (सुलेखा तळवळकर) नावाची एक विधवा स्त्री राहत असते. अंतू भटजींची बायको वारल्यानंतर राधाक्काच अंतु भटजींच्या मुलींचा सांभाळ करते व राधाक्काची जराशी वेडसर मुलगी 'कुंदन' (दीप्ती लेले) अंतुच्या दोन्ही मुलींची चांगली मैत्रीण असते. अंतू भटजी हे अत्यंत विद्वान असतात, पंचकृषित त्यांचं नावलौकिक असतं. जवळ्पासच्या अनेक गावांमधून त्यांना किर्तनासाठी बोलावणी येत असते. 'कीर्तनकार' अशी ख्याती असल्याने कीर्तन करणे हेच त्यांचं काम असतं. कामाची धावपळ वाढल्याने त्यांना मुलींकडे लक्ष देणं जड जाऊ लागले. म्हणूनच अंतू भटजींचे मित्र (प्रवीण तरडे) भटजींना दुसरं लग्न करण्याचा सल्ला देतात. जेणेकरून मुली व घराचा व्यवस्थित सांभाळ होईल. सुरुवातीला अंतू भटजींना हा सल्ला म्हणजे मूर्खपणा वाटतो. परंतु, राधाक्का जेव्हा या सल्ल्याला पाठिंबा देते तेव्हा अंतू भटजी राझी होतात. राधाक्काला खूप वाटत असतं की कुंदनचा विवाह अंतू भटजीसोबत व्हावा, कारण कुंदनला अंतू भटजी खूप आवडत असतात. परंतु, अंतू भटजींचा कुंदन सोबत लग्न करण्यास नकार असतो.

(पांघरून चित्रपटातील नायिका - लक्ष्मी)

 गोव्यातील एका १४ वर्षीय विधवा मुलीसोबत म्हणजेच 'लक्ष्मी' (गौरी इंगावले) सोबत अंतू भटजीचं लग्न होतं. खरं तर, आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या अंतु भटजींसोबत लग्न करण्यात लक्ष्मीला जरा ही रस नसतो. परंतु त्या काळात मुलींना आयुष्याचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या पदरात पडलं न्हवतं. घरातील थोर मंडळी सांगतील त्या मुलाशीच मुलींना विवाह करावा लागायचा. त्यामुळे वडिलांच्या (विद्याधर जोशी) शब्दाला मान देऊन, स्वतःच्या मनाची तयारी करत लक्ष्मीने अंतू भटजी सोबत विवाहाला होकार कळवला होता. अंतू भटजी व लक्ष्मी यांचं लग्न झालं हे कळताच, राधाक्काची मुलगी कुंदन जग सोडून निघून जाते. कारण, तिचं अंतू भटजी वर प्रेम जडलेलं असतं. जसे जसे दिवस सरतात तसतशी लक्ष्मी घरात रुळते. घराचा व मुलींचा व्यवस्थित सांभाळ करते. परंतु अंतू भटजी अजून सुद्धा पहिल्या बायकोच्या आठवणींमधून बाहेर आलेले नसतात. त्यामुळे अंतु भटजीनी लग्न झाल्यापासून लक्ष्मीला साधा स्पर्श सुद्धा केलेला नसतो. इकडे लक्ष्मी त्यांच्या स्पर्शासाठी व्याकुळ झालेली असते. तिला त्यांच्या स्पर्श हवाहवासा असतो.

(पांघरून चित्रपटातील अंतु भटजी व शिष्य माधव कीर्तनाचा रियाज करताना)

याच काळात लक्ष्मी व माधव (रोहित फालके), जो की लक्ष्मीच्याच वयाचा अंतू भटजींचा शिष्य असतो, त्या दोघांच्या मध्ये आकर्षण निर्माण होतं. व पुढे कथेला वेगळं वळण येतं. आता हे आलेलं वळण कथेला नेमकं कुठे नेवून पोहचवतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पांघरूण हा चित्रपट बघावा लागेल.

(पांघरून चित्रपटातील माधव व लक्ष्मी यांच्यातील आकर्षण)

एकूणच महेश सरांचं दिग्दर्शन अप्रतिम झालेलं असून, प्रत्येक पात्राने आपापली भूमिका चोखपणे निभावली आहे. सुरुवातीला, जरी चित्रपट संथ वाटला तरी जसजशी कथा पुढे पुढे सरकते तसतशी कथा आपल्याला तिच्याभोवती बांधून ठेवते आणि पुढे काय होईल हा सतत चटका लावते. दिग्दर्शन व भूमिका यांशिवाय या चित्रपटातील गाणे सुद्धा अप्रतिम आहेत. सध्या'ही अनोखी गाठ' व 'सतरंगी झाला रे' ह्या दोन गाण्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. सुप्रसिद्ध मराठी कवी वैभव जोशी यांनी या चित्रपटातील काही गाणी लिहिली आहेत. तर यांपैकी काही गाण्यांना सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले आहे व इंडियन आयडॉल फेम पवनदीप राजन, केतकी माटेगावकर, आनंदी जोशी यांसारख्या गायकांनी पार्श्वगायन केले आहे. त्याचबरोबर, स्त्रियांच्याही काही शारीरिक गरजा असतात हा मुद्दा अचूक पद्धतीने या चित्रपटात मांडला आहे. तर यारहो, पांघरून हा चित्रपट नक्की पहा.

  • ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील -
  • 83 Movie Review
धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या