पुस्तकप्रेमींना सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचायला का आवडतात ?

 

पुस्तकप्रेमींना सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचायला का आवडतात ?

Hello Friends!

तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत!

  • सुधा मूर्ती यांचे काही लोकप्रिय विचार -

संघर्ष हेच जीवन आहे.

आपल्या विद्यार्थ्याच्या ठायी जीवनाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करणं हेच शिक्षकाचं कर्तव्य आहे.

Having GOOD RELATIONSHIP, COMPASSION and PEACE of MIND is much more important than ACHIEVEMNETS, AWARDS, DEGREES OR MONEY.

MONEY is one thing which rarely UNITES and mostly DIVIDES people.

LIFE is an EXAM where the SYLLABUS is unknown and QUESTION PAPERS are not set. Nor are there MODEL ANSWER PAPER.

    आपल्या सर्वांनाच सुधा मूर्ती हे नाव परिचित आहे. सुधा मूर्ती या नारायण मूर्ती यांच्या पत्नी जरी असल्या तरी त्यांची स्वतःची ओळख आहे. आपण त्यांना समाज सेविका, लेखिका, व शिक्षिका म्हणून ओळखतो. परंतु, यांपैकी सुधा मूर्ती यांना आपण सर्वजण उत्तम लेखिका म्हणून चांगलं ओळखतो. ज्यांना पुस्तक वाचनाची आवड आहे, मग ते पुस्तक इंग्लिश, मराठी किंवा कन्नड यांपैकी कोणत्याही भाषेतील असो, त्यांनी आजपर्यंत सुधा मूर्ती यांचं किमान एक तरी पुस्तक नक्कीच वाचलं असेल. सुधाजींनी आजपर्यँत अनेक पुस्तके लिहिली आहेत व त्या पुस्तकांचं विविध भाषांमध्ये अनुवादन केलं गेलं आहे. सुधा मूर्ती यांची पुस्तकं फक्त भारतातच नाही तर जगभरात वाचली जातात. मित्रांनो, या मागे काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं ? चला तर मग जाणून घेऊया -

पुस्तकप्रेमींना सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचायला का आवडतात ?

  • सोपी लेखन शैली :

    दोस्तहो, मला वाटतं की सुधा मूर्ती यांची लिहिण्याची शैली अत्यंत सोपी व सहज आहे. सोपी म्हणजे इतकी सोपी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणी पण पुस्तक हातात घेतले व वाचायला सुरुवात केली तर त्यांना लगेच कळेल, उमजेल - इतकं सोपं व सहज ते लिहितात. सुधाजींच पुस्तक वाचताना असं वाटतं की सुधाजी आपल्याच भाषेत बोलत आहेत.

  • सत्य घटनेवर आधारित लेखन :

    दुसरं म्हणजे, मी आजपर्यंत सुधा मूर्ती यांची काहीं पुस्तकं वाचली, त्यावरून मला एवढं कळालं की, त्यांच्या पुस्तकातील कथा या सत्य घटनेवर आधारित असतात. आपल्या सर्वांनाच माहिती की सुधाजी ह्या इन्फोसिस फौंडेशनच्या चेअरमन आहेत. त्यामुळे संस्थेत सामाजिक काम करत असताना सुधाजींना आलेले अनुभव सुधाजी कथेच्या स्वरूपात स्वतःचे अनुभव आपल्यासोबत शेअर करतात.

  • अतिशयोक्ती मुक्त लिखाण :

    तिसरी गोष्ट म्हणजे, सुधाजी अतिशयोक्ती करत कथा जास्ती रंगवत नाहीत. कारण, कथा रंगवण्याच्या नादात बऱ्याचदा कथेचा गाभा सत्यतेपासून दूर होतो. कदाचित, कथा फार न रंगवण्याचं हे एक कारण असावं. कथेत अतिशयोक्ती नसल्याने सुधाजींच्या कथा वाचताना सतत सत्यतेची जाणीव वाचकांना होत राहते.

  • अनुभवांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन :

    सुधाजींचं साहित्य वाचताना... मग ते कथा असुदे किंवा आणखी काही. प्रत्येक अनुभवाकडे बघण्याचा त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, असं आपल्याला कळतं. त्यांची थॉट प्रोसेस इतरांपेक्षा वेगळी आहे असं जाणवतं. मला वाटतं, हीच गोष्ट त्यांच्या लिखाणाला किंवा साहित्याला इतर लेखकांच्या साहित्यापेक्षा वेगळं बनवते.

  • पुस्तक वाचताना मिळणारा नवा अनुभव :

    सुधाजीचं पुस्तक मला आवडण्याचं आणखीन एक कारण म्हणजे प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला एक आगळा वेगळा नवा अनुभव देऊन जाते. त्यांच्या कथा वाचताना आजपर्यंत मी खूप नवं नवीन अनुभव अनुभवलो आहे, ते ही घर बसल्या आणि एकाच जागेवर बसून ! याचं कारण म्हणजे, मी वर म्हंटल्याप्रमाणे सुधाजींचं लिखाण इतकं सोपं, सहज आणि आपलं वाटणारं आहे.

    मला वाटतं, वर मांडलेली कारणं ही अनेक कारणांपैकी काही मोजकीच कारणं आहेत ज्यामुळे पुस्तकप्रेमींना सुधाजींची पुस्तकं वाचायला आवडतात.

    धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या