|
(बप्पी लहीरी यांचे छायाचित्र)) |
बप्पी लहीरी
लोकप्रिय बॉलीवुड सिंगर, कोंपोजर, आणि रेकॉर्ड प्रोड्यूसर बप्पी लहीरी यांचं १६ फेब्रुवरी २०२२ रोजी क्रिटीकेयर हॉस्पिटल, मुंबई येथे निधन झालं. बप्पी लहीरी यांचा जन्म २७ नोवेंबर १९५२ या दिवशी पश्चिम बंगाल येथील जलपाईगुरी या गावात झाला होता. मित्रांनो, तुम्हाला बप्पी लहीरी यांचं खरं नाव काय होतं माहिती आहे का? आलोकेश लहीरी हे बप्पी लहीरी यांचं खरं नाव होतं. बप्पी लहीरी यांनी स्वतःच्या युनिक आवाजाने व डिस्को म्युझिकने इंडियन सिनेमा मध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच, डिस्को डान्सर, यार बिना चैन कहा रे सारखी गाण्यांनी संगीतप्रेमींना वेड लावलं होतं व आज सुद्धा या गाण्यांना संगीतप्रेमी तितकंच प्रेम करतात.
- बप्पी लहीरी यांचे कुटुंब व बालपण:
|
(बप्पी लहीरी मामा- किशोर कुमार यांच्यासोबत) |
- बप्पी लहीरी यांचे वडील, आपरेश लहीरी, व आई - बनसूरी लहीरी दोघे सुद्धा क्लासिकल गायक व म्युझिशियन होते. तर किशोर कुमार हे बप्पी लहीरी यांचे मामा होते.
|
(बालपणी बप्पी लहीरी तबला वाजवतानाचा क्षण) |
- बप्पी लहीरी यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच तबला वाजवायला सुरुवात केली होती.
|
(बप्पीदा विथ ज्वेलरी) |
- लहानपणापासूनच, अमेरिकन सिंगर एलविन प्रेसले यांना बप्पीदा नी आदर्श मानले होते. एलविन प्रेसले यांच्या कडूनच प्रेरित होऊन बप्पीदा ज्वेलरी परिधान करायला सुरुवात केली होती.
|
(बप्पी लहीरी लाईव्ह परफॉर्मेंस करताना) |
- बप्पी लहीरी यांनी ७०, ८० व ९० च्या सुरुवातीचा काळ गाजवला. वयाच्या १९ व्या वर्षी बप्पी लहीरी पहिल्यांदा मुंबई आले.
- 'दादू' या बंगाली चित्रपटात बप्पीदा ने पहिल्यांदा संगीत दिले. या चित्रपटासाठी बप्पीदा ने गान कोकिळा लता मंगेशकर यांच्याकडून गाणे गाऊन घेतले.
- तसेच, 'न्ह्णना शिकारी' हा त्यांचा पहिला हिन्दी चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी हिन्दीतील सुप्रसिद्ध गायक मुकेश यांच्याकडून गाणे गाऊन घेतले.
- 'चलते-चलते' या चित्रपटातील सर्व गाणी प्रसिद्ध झाल्यामुळे बप्पी लहीरी हे म्युझिक डायरेक्टर म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाऊ लागले.
- बप्पी लहीरी यांच्या नावे असलेले रेकॉर्ड व पुरस्कार:
|
(बप्पी लहीरी फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड स्वीकारताना) |
- जितेंद्र यांच्या सलग बारा सिल्वर जुबली चित्रपटांना संगीत देऊन बप्पी दा ने रेकॉर्ड केला.
- १९८६ साली ३३ चित्रपटांची १८० गाणी रेकॉर्ड करून जिनिअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्वतःच्या नावे रेकॉर्ड नोंदवला.
- ६३ व्या फिल्म फेअर अवॉर्ड शो मध्ये बप्पी लहीरी यांना फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
- बप्पी लहीरी यांचं राजकीय करिअर:
|
(बप्पी लहीरी मोदी यांच्या फोटोफ्रेम सोबत) |
- बप्पी लहीरी यांनी राजनाथ सिंह यांच्या उपस्थित ३१ जानेवारी २०१४ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
- २०१४ साली सरेरामपूर मधून निवडणूक लढली, परंतु कल्याण बॅनर्जी कडून पराभव पत्करावा लागला.
- बप्पी लहीरी यांच्या लोकप्रिय गाण्यांची यादी:
- याद आ रहा हे
- इंतेहा हो गई
- डिस्को डान्सर
- यार बिना चैन कहा रे
- आज रपट जाये तोह
- उह ला ला
- दे दे प्यार दे
- आऊआ आऊआ कोई यहा नाचे
- रात बाकी बात बाकी
- जवान जान-ई-मन
वरील पोस्ट मी 'द मॅंन विथ गोल्डन हार्ट - बप्पी दा' यांना समर्पित करतो.
0 टिप्पण्या