Marathi Book Review : श्यामची आई - साने गुरुजी

पुस्तकाचे नाव : श्यामची आई

लेखक : साने गुरुजी

प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स

पृष्ठ : २४०

भाषा : मराठी

किंमत : ₹१०५/-

Marathi Book Review 
श्यामची आई

   आपल्या सर्वांचे आवडते लेखन साने गुरुजी यांनी 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिले आहे. श्याम लहान असतानाच श्याम ची आई वारते. आई वारल्यानंतर आईच्या स्मृती रात्रीच्या वेळी श्याम आपल्या सवंगड्यांना सांगतानाचं वर्णन म्हणजे हे पुस्तक !! आईची प्रत्येक स्मृती ही खूप सुंदर रित्या पुस्तकात मांडण्यात आली असून, पुस्तक वाचता वाचता 'अरे !! मी पण बालपणी असाच होतो', असं म्हणत तुम्ही हसाल, अनेक ठिकाणी रडाल ही, पण हेच ते पुस्तक आहे जे आपल्याला जाणीव करून देईल की आई-वडिलांनी आपल्यावर केलेल्या संस्कारांच ऋण फेडायला आपल्याला सात जन्म ही कमी पडतील !! जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल, तेव्हा तुम्हाला तुमची आईची मुर्ती नजरेसमोर उभारल्याशिवाय राहणार नाही. श्यामच्या गोष्टी वाचताना, तुम्ही पुन्हा - पुन्हा बालपणात जाल. तुमच्या बालपणीच्या स्मृती जाग्या होतील व त्या तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या फुलाप्रमाणे डोलतील एवढं मात्र नक्की..!!

    श्याम ला त्याच्या आईने काय शिकवलं, कसं घडवलं, कसं चांगल्या विचारांचं अंकुर त्याच्या मनात पेरलं, कसं मार्गदर्शन केलं हे तो आईच्या प्रत्येक आठवणीतून आपल्या मित्रांना सांगत असतो, त्यातून आपल्याला सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे, म्हणून मला वाटतं सर्वांनी एकदा तरी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.

धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या