पुस्तकाचे नाव : नारायण मूर्ती - मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य
मूळ लेखक : एन. चोक्कन
मराठी अनुवाद : अंजनी नरवणे
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : ११०
भाषा : मराठी
किंमत : ₹१३०
Marathi Book Review
नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य
आयुष्यात ध्येयापर्यंत पोहचण्यात आनंद नसतो, नवनवीन ध्येयांकडे वाटचाल करत राहण्यात असतो
- नारायण मूर्ती
नारायण मूर्ती यांच्या आजपर्यंतच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. नारायण मूर्ती हे फक्त नाव नसून एक प्रेरणास्रोत आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. गरीब कुटूंबात जन्मलेले नारायण मूर्ती ते इन्फोसिस चे संस्थापक पर्यँतचा खडतर प्रवास लेखिकेने या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. मूर्तीचे बालपण, कॉलेजजीवन दोन्ही ही हालाकीच्या परिस्थितीत पार पडले. मूर्ती यांच्या कॉलेजमधल्या करामती आपल्याला निखळ हास्याचा अनुभव देऊन जातात. आय. आय. टी. ला प्रवेश मिळाला होता पण वडिलांकडे पैसे न्हवते म्हणून इंजिनिअरिंग केलं. त्यांनंतर, आय. आय. टी. ला प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांची धडपड वाचून आपल्याला देखील प्रेरणा मिळते. नोकरी करत असताना त्यांची सुधा या तरुणीसोबत ओळख होते. ओळखीतून मैत्री होते आणि मैत्रीतून प्रेम बहरते. त्यांची प्रेम कहाणी लेखिकेने त्यांच्या प्रेमाप्रमाणेच निरागस शब्दांत व काहीही न लपवता प्रामाणिकपणे आपल्यासमोर मांडली आहे. असं म्हणतात की, वाचन आणि प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जातात. मूर्ती यांच्या बाबतीत पण असंच झालं. एका साम्यवादी देशाच्या जेल मध्ये मूर्तींना तब्बल साठ तास कोंडून ठेवलं गेलं... ते साठ तासचं खरं तर इन्फोसिस च्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरले. 'इन्फोसिस' स्थापन करताना नारायण मूर्ती व त्यांचे अन्य सात सहकाऱ्यांनी घेतलेले कष्ट, त्यांची ओढाताण, त्यांचे प्रयत्न, त्यांची जिद्द, चिकाटी आणि बरंच काही..वाचल्यानंतर आपल्या शरीरात चारशे चाळीस वोल्टचा Motivational Current दौडल्याशिवाय राहत नाही.
- ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील -
- तीन हजार टाके - सुधा मूर्ती
- How to Win Friends and Influence People - Dale Carnegie
आपण वाचलेलं प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही देऊन जातं. काही पुस्तकं नवे विचार देतात, काही पुस्तकं नवी शिकवण देतात, तर काही पुस्तकं काही और. हे पुस्तक आपल्याला प्रेरणा देते, मोठी स्वप्न पाहण्याच्या विचाराला बळ देते, असं मला वाटतं. ज्यांची स्वप्न मोठी आहेत, ज्यांना उंच-उंच उडत यशाच्या शिखरावर पोहचायचं आहे, ज्यांना आयुष्यात 'बाप' काम करायचं आहे, त्यांच्या पंखांना बळ देणारं हे एक प्रेरणादायी पुस्तकं अंजनी जी ने आपल्याला दिलं आहे.
(वयक्तिक अनुभव : पुण्याहून परतीचा प्रवास करत होतो. प्रवास रात्रीचा होता. रेल्वेत वाचण्यासाठी म्हणून हे पुस्तक घेतलं. सीट पकडली आणि पुस्तक उघडून वाचायला लागलो. रात्रीचे ४ वाजले तरी माझ्या हातातून पुस्तक सोडवत न्हवतं. वाचता - वाचता पुस्तक कधी वाचून झालं, कळालं देखील नाही. एकदा हातात घेतलं की माझ्याप्रमाणे तुम्हाला ही सोडवणार नाही, असं हे पुस्तक आहे.)
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
0 टिप्पण्या