लेखक : पू. ल. देशपांडे
वर्ग : निवडक प्रतिक्रिया संग्रह
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
पृष्ठ : १९८
भाषा : मराठी
किंमत : ₹२४५/-
MARATHI BOOK REVIEW
दाद
मागच्या काही वर्षांपासून मी पु. ल. देशपांडे. ह्या विनोदी लेखकाचं नाव फक्त ऐकून होतो, पण मध्यंतरी जेव्हा त्यांचा जीवनचित्रपट 'भाई व्यक्ती की वल्ली' पाहिला, मला चित्रपट खूप आवडला. तेव्हापासून मात्र त्यांच्याबद्दल विलक्षण कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं. जेव्हा वाचनालया मध्ये गेलो तेव्हा नेमकं पु.लं. च 'दाद' हे पुस्तक माझ्या हाताला लागलं, क्षणाचाही विलंब न करता पुस्तक वाचायला सुरुवात केली. चित्रपटातले विनोदी पु. लं. मी पाहिले होते परंतु ह्या पुस्तकातले पु. लं. म्हणजे गंभीर !! दाद हे मी वाचलेलं पाहिलं पुस्तक. मला वाचण्याची आवड अजिबात नव्हती, त्यात हे गंभीर पुस्तक !! सुरुवातीला जरा कंटाळवाणं झालं पण मी वाचणं सोडलं नाही. वाचता वाचता 'आईस पत्र' नावाचं गोऱ्या देशातील थोऱ्यामोठ्या व्यक्तींनी आपल्या आईला लिहिलेली पत्रांचा संग्रह असलेल्या पुस्तकातील विनोदी घटना पु. लं. सांगतात तेव्हा खूप हसू येतं. ह्या एका भागाने मला कंटाळवाणं वाटणाऱ्या पुस्तकाबद्दल थोडा इंटरेस्ट निर्माण केला अनं बघता बघता मी संपूर्ण पुस्तक कधी वाचलं मला कळलं ही नाही. ह्या पुस्तकात पु. लं. नी त्यांना आवडलेले पुस्तकं, प्रसंग, चित्रपट, मित्र, ह्यांच तोंड भरून कौतुक केल आहे. त्यामुळेच, पुस्तकांच नाव 'दाद' ठेवलं असेल.
- हे सुद्धा तुम्हाला वाचायला आवडेल -
- चिअर्स - व. पू. काळे
पुस्तक वाचताना मला पु.लं. चा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजला. त्याच्या विचारातली सकारात्मकता जाणवली. त्याचं मित्रांवर असलेलं प्रेम आणि आपुलकी दिसली. हे पुस्तक वाचल्यामुळे माझ्या विचारातही सकारामक्ता वाढली आहे तसेच काही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलला आहे. आपला इगो, टेट्स, पद, बाजूला ठेऊन अशी मनापासून 'दाद' दिली त्यासाठी पु. लं. चे मनापासून आभार !!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
0 टिप्पण्या