Marathi Book Review : 'एका अवलीयचा प्रपंच' - अंजली ठाकूर


पुस्तकाचे नाव : 'एका अवलीयचा प्रपंच'

लेखिका : अंजली ठाकूर

प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स

पृष्ठ : २७२

भाषा : मराठी

किंमत : ₹ ३३०/-

MARATHI BOOK REVIEW 
एका अवलीयचा प्रपंच

    "आमटे कुटुंबाचा आतापर्यंतचा प्रवास लेखिका अंजली ठाकूर यांनी या पुस्तकातून अतिशय सुंदररित्या आपल्यासमोर मांडला आहे. बाबा आमटे यांचे बालपण, शिक्षण, लग्न आणि नंतर परिवरसमावेत आयुष्यभर कुष्ठरोग्यांसाठीची सेवा हा प्रवास आपल्याला नक्कीच कल्पनेच्याही पलीकडच्या जगात नेतो. 'आनंदवन' सुरू करताना बाबांना आलेल्या अनेक समस्या सोडवत, कुष्ठरोग्यांची सेवा करत, अनंदवनाचं 'गोकुळ' करण्यापर्यंतची बाबांची कहाणी वाचताना आपण थक्क होतो. तसेच डॉ. विकास आमटे यांचे आनंदवणासाठीचे अमूल्य योगदान व हेमलकसा येथे माडिया आदिवासींसाठी प्रकाश आमटे यांनी अनेक अडचणींचा सामना करत सुरू केलेला लोकबिरादरीचा प्रकल्प याची सखोल माहिती अंजली ठाकूर यांनी या पुस्तकात मांडली आहे.

    बाबांच्या काम करण्याच्या शैलीतून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे तसेच डॉ. विकास आणि डॉ प्रकाश याच्या कामातूनही आपल्याला प्रेरणा मिळते. हे पुस्तक वाचत असताना आपल्याला कळत-नकळत आनंदवनात एक फेरफटका मारून आल्यासारखं वाटतं ! पुस्तक वाचून होईपर्यँत एकदा तरी आनंदवन व हेमालकसाच्या प्रकल्पला आपण भेट द्यावी व कुष्ठरोग्याचं व आदिवासीं लोकांचं जीवन जवळुन पाहावं, अशी इच्छा आपल्याला झाल्यावाचून राहत नाही. मला वाटतं, याचं संपूर्ण श्रेय लेखिका अंजली ठाकूर यांना जातं. हे पुस्तक आपल्याला घरबसल्या अनेक नवनवीन अनुभव करवून देते तसेच आमटे परिवराच्या कार्याबद्दल व त्यागाबद्दल माहिती देते. आमटे परिवारावर आधारित हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच आपल्या मानसिकतेत काही महत्वपूर्ण बदल होतील, अशी खात्री वाटते. त्यामुळे, सर्वांनी हे पुस्तक किमान एकदा तरी आवर्जून वाचावं."

धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या