पुस्तकाचे नाव – दोस्त
लेखक - व. पु.काळे
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
वर्ग – कथासंग्रह
पृष्ठसंख्या – १६६
भाषा – मराठी
Marathi Book Review
दोस्त : व. पु. काळे
Hello Friends!
तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत!
मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत व. पु. काळे यांच 'दोस्त' हे पुस्तक मला कसं वाटलं ते शेअर करणार आहे.
'दोस्त' हा एक कथा संग्रह आहे. या कथा संग्रहात विविध अनुभव देऊन जाणाऱ्या ऐकून २१ कथा आहेत. प्रत्येक कथा व कथेचा विषय वेगळा असला तरी दैनंदिन जीवनात घडणाऱ्याच या घटना आहेत. यापैकी काही कथा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की "अरे भाई, मेरे साथ भी ऎसा ही कुछ हुआ था !"
'मस्तानी' नावाच्या कथेत पुरुष हा सुंदर स्त्रियांवर कसा भाळतो, व सुंदर स्त्रिया आपल्या सौंदर्याच्या जोरावर अश्या भाळणाऱ्या पुरुषांना कसं फसवतात याचं मजेशीर वर्णन वपुनी केलं आहे. पैश्यांनी गरीब असणारा मित्र मनाने किती श्रीमंत असू शकतो याचा प्रत्येय आपल्या 'श्रीमंत' नावाची कथा वाचल्यावर येतो. जोडीदार शोधताना स्टेटस, पैसा, रूप, प्रोफेशन नावाच्या गोष्टींना आजकाल आपण किती प्राधान्य देतो व दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणा, माणुसकी, कष्ट, जिद्द, इ. सारख्या गोष्टींना दुर्लक्ष करून आपण किती मोठी चूक करतो आहे, हे आपल्याला 'टॅक्सी ड्राइवरची बायको' ही कथा वाचल्यानंतर कळून चुकतं. 'लग्नाचा पहिला वाढदिवस' ही कथा मला इतर कथांपेक्षा निराळी वाटते. कारण आपल्या आजूबाजूला अनेक लोकं वावरत असतात. त्यातले काही आपले परीक्षक सुद्धा असतात. त्यांनी घेतलेल्या परीक्षेत आपण पास झाल्यानंतर जो लाभ होतो तो खास असतो. परंतु, प्रत्येक वेळेस लाभ होतोच असं काही नियम नाही. पण, असाच लाभ एका नवऱ्याला झाला. त्याची आपल्याला सरप्राईज करून टाकणारी कथा म्हणजेच - 'लग्नाचा पहिला वाढदिवस'. यांसारख्या बाकीच्या कथा वाचण्यासाठी तुम्ही पुस्तक नक्की वाचावं ही माझी केवळ अपेक्षा आहे म्हणूनच - मला आवडलेल्या कथांपैकी जाणीवपूर्वक मोजक्याच कथांचा उल्लेख मी इथे करतो आहे.
मित्रांनो, दोस्त ह्या पुस्तकातील कथा आपल्याला हसावतात, रडवतात तर काही कथा आपल्याला आगळा वेगळा नवीन अनुभव देऊन जातात. म्हणूनच दोस्त हे पुस्तक मला खूप आवडलं आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. दोस्तहो! मी मुद्दामच मला आवडलेल्या कथांपैकी मोजक्याच कथांचा उल्लेख इथे केला आहे. कारण यांसारख्या बाकीच्या कथा वाचण्यासाठी तुम्ही पुस्तक नक्की वाचावं ही माझी केवळ अपेक्षा आहे.
फ्रेंड्स, तुम्हाला नेहमी सतावणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच दिलेलं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे 'आता कोणतं पुस्तक वाचावं ?' तर आता जेव्हा केव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा दोस्त हे पुस्तक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
दोस्त हे पुस्तक फ्लिपकार्ट व ऍमेझॉन या दोन्ही Website वर Available आहे तेथून तुम्ही खरेदी करू शकता. तसेच हे पुस्तक तुम्ही सुद्धा तुमच्या 'Dear Ones' ना भेट म्हणून सुद्धा देऊ शकता.
- ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील -
- चिअर्स - व. पू. काळे
- तीन हजार टाके - सुधा मूर्ती
वपु चं पुस्तक म्हणजे वाचन वेड्यांसाठी एक पर्वणीच असते. 'दोस्त' हे पुस्तक मला खूप दिवसांपासून वाचायचं होतं. लायब्ररी मध्ये शोधून पण सापडलं न्हवतं. एके दिवशी माझ्या एका मैत्रिणीने मला हे पुस्तक 'भेट' म्हणून अमेझॉन ने पाठवून दिलं. कोणीतरी आपल्याला न कळवता आपल्या आवडीचा पदार्थ आपल्या पुढ्यात ठेवावा आणि तो खाताना आपल्याला जितका आनंद होतो तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आनंद मला 'दोस्त' हे पुस्तक वाचताना होत होता. ही पर्वणी मला दिल्याबद्दल माझ्या मैत्रिणीचे खूप खूप धन्यवाद, आभार व प्रेम !
धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com
0 टिप्पण्या