Pawankhind Movie Review

Marathi Movie Review

पावनखिंड

Hello, Hii आणि नमस्कार मित्रांनो!

तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत!


मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' हा चित्रपट मला कसा वाटला ते शेअर करणार आहे.

तर मित्रांनो, 'पावनखिंड' हा मी पाहिलेला आजपर्यंतचा दर्जेदार ऐतिहासिक मराठी चित्रपट होता. मला हा चित्रपट इतका आवडला आहे की सध्यातरी या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय काय सांगू असं झालं आहे.

तर सुरुवात स्टोरीपासूनच करतो. आपल्या सर्वांना 'पावनखिंडी'ची कथा माहितीच आहेच. महाराज सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या कडक वेढ्यातून सुटून विशालगडाकडे जाताना, मधल्या खिंडीत शत्रूला अडवून धरण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या इतर साथीदारांनी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूसोबत झुंज देत देत स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि म्हणून आपण त्या खिंडीला 'पावनखिंड' म्हणून ओळखतो.

मित्रांनो, माहिती असलेली स्टोरी पुन्हा पाहताना क्षणभर सुद्धा कंटाळवाणं वाटलं नाही. आता याची अनेक कारणं आहेत.

पाहिलं म्हणजे सर्वांचीच अप्रतिम Acting. चिन्मय मांडलेकर यांची छत्रपती शिवाजी महाराज, अजय पुरकर यांची बाजीप्रभू देशपांडे, हरीश दुधडे यांची बहिर्जी नाईक व अंकित मोहन यांची रायाजी बांदल यांची भूमिका

तर दुसऱ्या बाजूला समीर धर्माधिकारी यांची सिद्धी जोहर व क्षिती जोग यांची 'बडी बेगम'ची भूमिका कौतुकास्पद आहे. या सर्वांच्या Acting ला खरंच सलाम !

दुसरं कारण म्हणजे दिगपाल लांजेकर यांचं लाजवाब डिरेक्शन आणि काळजाला भिडतील असे डायलॉगज ! त्याचबरोबर, या चित्रपतील अकॅशनसीन्सने सुद्धा मला फार प्रभावित केलं. पावनखिंडीतली लढाई पाहताना तर अक्षरशः मला वाटायला लागलं होतं खरंच ! अशीच लढाई त्यावेळी सुद्धा झाली असेल, इतकं सच्चेपण चित्रीकरणात होतं. ही कथा प्रेक्षकांसामोर इतक्या सुंदररित्या मांडली आहे की शेवटी शेवटी तर आपण खुर्चीला खिळून राहतो. Acting आणि डायलॉगज दोन्ही अप्रतिम असल्याने वेळोवेळी डोळे आपोआप पाणावतात तसेच वेळप्रसंगी आपोआपच आपल्याकडून जोरात शिट्टी वाजवली जाते. याव्यतिरिक्त चित्रपटातील गाण्याबद्दल बोलायचं झालं तर प्रसंगाला अनुसरून 'राजं आलं' आणि 'युगत मांडली' ही दोन गाणे चित्रपटात आहेत. या दोन्ही पैकी मला युगत मांडली हे गाणं फार आवडलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे - बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, बहिर्जी नाईक यांच्या बद्दलचा आदर आणखीनच वाढला आहे.

तर मित्रांनो, मला सगळ्या दृष्टीने हा चित्रपट खूप आवडला. आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. कारण, शाळेत असताना इतिहासाच्या शिक्षकांनी रंगवून सांगितलेली पावनखिंडीची कथा पांढऱ्या पडद्यावर पाहायला खूप भारी वाटतं. म्हणूनच दोस्त हो, 'पावनखिंड' हा चित्रपट नक्की बघा.

धन्यवाद ! शुक्रिया ! आभार ! अँड थँक यु Friends ! तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.

Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या