Gangubai Kathiawadi Movie Review

 

Bollywood Movie Review

गंगूबाई काठीयावाडी

नमस्कार मित्रांनो!

तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत करतो.

मित्रांनो मी आजच संजय लीला भन्साळी निर्मित गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिला. आणि तो चित्रपट मला कसा वाटला ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

तर मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट म्हणजे Best Direction, Acting, Songs, Dialogues  आणि महत्वाचं म्हणजे एक वेगळा विषय यांचं फुल्ल Package असतो. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात सुद्धा आपल्याला हे सगळं म्हणजे सगळं पाहायला मिळतं. आता गंगुबाई काठियावाडी हे नाव ऐकताच आपल्या लक्षात येतं की ही फिल्म एका महिलेवर आधारित आहे. आणि जर ट्रेलर बघितला तर आपल्याला कळतं की गंगुबाई ह्या एका लेडी लीडरची ही कहाणी आहे. बॅरिस्टरची मुलगी 'गंगा'चं एका मुलावर खूप प्रेम असतं. हेरॉईन बनवण्याचं अमिश दाखवून गंगाचा प्रियकर गंगाला मुंबईत आणतो. व मुंबईत आल्यावर शीला नावाच्या कोठेवालीसोबत फक्त हजार रुपयांमध्ये गंगाचा सौदा करतो. आता अश्या प्रकारची स्टोरी आपण बऱ्याचवेळा अनेक चित्रपटांमधून पाहिली आहे. पण गांगुबाईची स्टोरी या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ती कशी ते सांगतो. शरीरविक्रीची सुरुवात करताना गंगा ची गंगू होते. आणि पुढे शिला नावाची मुखींया वारल्यानंतर गंगूच त्या कोठ्याची मुखींया होते. गंगू नुसती मुखींया होत नाही तर गंगुबाई बनून कोठ्यातल्या सगळ्या वैशयांची आईप्रमाणे काळजी घेते. आपल्या डेरिंगबाज, तेवर वाल्या अंदाजात त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते व इतर लोकांप्रमाणे वैश्यांना सुद्धा समान न्याय व अधिकार मिळावा अशी बेधडकपणे व नजरेला नजर मिळवत समाजासमोर मागणी करते. ही स्टोरी फक्त इथेच थांबत नाही तर, गंगुबाई आपल्या मागण्या घेऊन पंतप्रधानपर्यंत पोहचते. मला वाटतं, हेच कारण आहे जे या फिल्मला Unique ठरवते.

आता गंगुबाई वैश्यांच्या समस्या कश्या सोडवते ? त्यांना समान न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी काय काय करते ? आणि पंतप्रधानपर्यंत कशी पोहचते व काय मागणी करते ? यांसारखे अनेक प्रश्न तुम्हाला पण पडले असतील. तर या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला गंगुबाई काठियावाडी ही फिल्म बघावी लागेल.

पण मित्रांनो एक गोष्ट नक्की आहे की गंगा पासून गंगुबाई काठियावाडी हा प्रवास जितका Emotional आहे तितकात Inspirational सुद्धा आहे. गंगूबाईच्या या प्रवासात करीम लाला म्हणजेच अजय देवगनची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते व अजय देवगणने नेहमी प्रमाणाने आपली भूमिका एकदम कडक निभावली आहे.

त्याचबरोबर, आलीया भट्टच्या  Actingला, डायलॉग डिलिव्हरीला, व तिच्या लुकला माझ्याकडून फुल्ल मार्क्स ! As a Leader म्हणून आलियाचा हा एकदम पॉवरफुल परफॉर्मन्स आहे व तिने तो यशस्वीपणे निभावला आहे, असं मला वाटतं.

यारहो, गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट मला खूप म्हणजे खूप आवडला आणि तुम्हाला पण आवडेल. कारण गांगुबाईची  Twists और Turns वाली स्टोरी युनिक और दिल को छु लेनेवली हैं आणि ह्या चित्रपटात आपल्याला Reality, Romance, Leadership, Rolitcs हे सगळंच एकत्रित पाहायला भेटतं. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाच्या मदतीने वैश्यांचं जीवन व त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्या प्रेक्षकांना जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो, गंगुबाई काठियावाडी ही #mustwatch फिल्म नक्की बघा.

धन्यवाद ! शुक्रिया ! आभार ! अँड थँक यु Friends ! तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.

Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या