Bollywood Movie Review
झुंड
नमस्कार मित्रांनो!
तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत करतो.
तर मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट मला कसा वाटला ते शेअर करणार आहे.
फार दिवसांपासून आपण सगळेचजण 'नागराज मंजुळे आणि बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन' ह्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर ०४ मार्च २०२२ रोजी 'झुंड' हा प्रदर्शित झाला आणि आपली प्रतीक्षा संपली. झुंड हा चित्रपट नागपुरातील सुप्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे सरांवर आधारित आहे. अर्थात विजय बारसे सरांच्या भूमिकेत आपल्याला अमिताभ बच्चन दिसणार आहेत. त्याच बरोबर सैराट फेम आकाश ठोसर व रिंकू राजगुरु आणि सुप्रसिद्ध मराठी कवी किशोर कदम हे सुद्धा आपल्याला बिग बी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील.
तर मित्रांनो, स्टोरीला सुरुवात करण्याआधीच मी तुम्हाला हे सांगेल की झुंड हा चित्रपट काहीतरी वेगळा आहे. आणि मला 'झुंड' हा चित्रपट जाम आवडला. कारण, या चित्रपटाचा विषय फार वेगळा आहे. विजय बारसे सर कॉन्व्हेंट स्कूल मध्ये क्रीडा प्रशिक्षक असतात. त्या शाळेच्या पाठीमागेच झोपडपट्टी असते. तिथल्या मुलांसाठी चोऱ्या माऱ्या, दारू-गांजाची विक्री, भांडण-लफडे म्हणजेच सगळं असतं. त्यावरच त्यांचं पोटं असतं. एकेदिवशी खूप पाऊस पडत पडत असतो, त्या पावसात ही पोरं प्लॅस्टिकच्या डब्यालाच फुटबॉल समजून फुटबॉल खेळत असतात. त्यांचं खेळणं बघून विजय सर भारावुन जातात. विजय सरांना त्यांचं टॅलेंट शाळेतल्या मुलांपेक्षा कितीतरी पटीने जास्ती वाटलं. आणि म्हणूनच विजय सर त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतात. आता प्रशिक्षण देण्याची जी सुरुवात होते, ती अत्यंत मजेशिर आहे. मुव्ही पाहताना तुम्ही बघालच. परंतु, झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देताना, विजय सरांवर अनेकजण टीका करतात. पण, विजय सरांना त्या मुलांच्या टॅलेंट वर खूप विश्वास असतो.
मित्रांनो, स्टोरी जसं जशी पुढे जाते, तसतशी ती वेगवेगळे वळण घेत घेत जाते. स्कूल आणि झोपडपट्टीच्या पोरांमध्ये एक मस्त रंगतदार सामना होतो. सामन्याआधी शाळेतील काही शिक्षक विजय सरांच्या संघाला 'झुंड' म्हणून हिनवतात. पण विजय सर ज्या विश्वासाने सांगतात - "इन्हे झुंड नहीं, टीम बोलीये" तो क्षण आपल्याला भावुक करणारा आहे. आता तो सामना कोण जिंकतो व त्यात काय काय मजेदार घटना घडतात, हे मी अजिबात सांगणार नाही. आणि शेवटी जगभरातल्या झोपडपट्टीतल्या मुलांची आंतरराष्ट्रीय Tournament होते. परंतु झोपडपट्टीतली मुलं चोऱ्या-माऱ्या, दारू, भांडण, लफडे यांच्याशी जुडलेले असल्याने, त्यांचे पासपोर्ट मिळवण्यासाठी व पैसे गोळा करण्यासाठी विजय सरांना खूप अडथळे येतात. आता पासपोर्ट व पैसे मिळतात की नाही? आणि विजय सरांची टीम Tournament खेळायला जाऊ शकतात की नाही ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघायला लागेल.
एकूणच, झोपडपट्टीतील लोकांकडे आपल्या इतकंच किंवा आपल्या पेक्षा सुद्धा किती तरी पटीने जास्त टॅलेंट आहे, परंतु सामाजिक भेदभावामुळे हे टॅलेंट कोणाला दिसून येत नाही, असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केलाय. मित्रांनो, ह्या चित्रपटात तसं बघायला गेलं तर खूप भारी स्टारकास्ट नाहीये. बच्चन साहेब आणि नागराज मंजुळे ही दोनच नावं आपल्याला चित्रपट बघायला भाग पडणारी आहेत. आणि ह्या दोघांनी ही त्यांचं काम अप्रतिम केलंय. नागराज सरांचं दिग्दर्शन आणि बिग बी ची ऍक्टिन्ग मस्त झाली आहे. तर यार हो, 'झुंड' हा चित्रपट नक्की बघा.
धन्यवाद! शुक्रिया! आभार! अँड थँक यु Friends! तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
0 टिप्पण्या