'दोन मने' पुस्तकातील सुंदर क्योट्स

'दोन मने या पुस्तकातील सुंदर क्योट्स'

दोन मने- वि. स. खांडेकर

  • कायदा आंधळा, नीती पांगळी, समाज बहिरा!
  • मोहाला बळी पडणारं एक मन मनुष्यात असतंच.
  • जिथं माणूस अत्यंत सुखी असतो तेच त्याचे घर! नाही का?
  • घरसुद्धा पुरते न उजळणारी मिणमिणती पणती होण्यात काय अर्थ आहे? क्षणभर का होईन, ब्रह्मांड उजळून टाकणाऱ्या विजेप्रमाणे चमकून जावे.
  • आयुष्यात मोहाचे क्षण वारंवार येतात, पण या क्षणांवर जे विजय मिळवतात तेच आपल्या आयुष्यावर सत्ता चालवू शकतात.
  • सहानुभूती ही पाण्यासारखी आहे. उलट प्रत्यक्ष कृती हे अन्न आहे. नुसत्या पाण्यावर मनुष्य फार दिवस जगू शकत नाही
  • पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींपैकी न लिहिलेल्या गोष्टीच आयुष्यात अधिक घडतात.
  •  हिरवळ वाढायला थोडासाही ओलावा पुरतो.
  • अनंत मारणांना मिठी मारण्यातइकी माधुरी प्रेमाच्या एका क्षणात असते.
  • संकटं आली म्हणून मोठी माणसं काही आपलं ध्येय सोडत नाहीत!
  • जग ज्यांना शहाणं ठरवितं ते मूर्ख तरी असतात नाही तर लबाड तरी असतात.
  • दोन वेड्यांचे पटत नाही म्हणे कधी! दोन शहाण्यांइतकी तरी त्यांची भांडणं होत नसतील!
  • स्वप्नापेक्षा सत्याचेच अनुभव कधी कधी विलक्षण असतात!
  • मृत्यूसारखा जगात दूसरा कुठलाही चोर नाही. तो कोणत्या क्षणी येईल आणि आपले काम साधील-
  • खरे तत्वज्ञान पुस्तकात नसते, अनुभवात असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या