Marathi Movie Review
दगडी चाळ २
नमस्कार मित्रांनो!
तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत!
मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' हा चित्रपट मला कसा वाटला ते शेअर करणार आहे.
तर मित्रांनो 'दगडी चाळ २' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १९ ऑगस्ट २०२२ ला प्रदर्शित झाला. 'दगडी चाळ २' ची स्टोरी ही बऱ्यापैकी पहिल्या दगडी चाळ सारखीच दाखवली आहे. फक्त फरक इतकाच की पहिल्या दगडी चाळ ची स्टोरी फक्त दगडी चाळी भोवती फिरत होती आणि दगडी चाळ २ ची स्टोरी ही दगडी चाळी सोबतच राजकारण आणि अंडरवर्ल्ड भोवती फिरते.
Characters बद्दल बोलायचं झालं तर Characters आणि Actors सुद्धा तेच आहेत, जे आधी होते. Daddy च्या भूमिकेत मकरंद देशपांडे, सूर्याची भूमिका अंकुश चौधरी आणि सूर्याच्या पत्नीच्या भूमिकेत पूजा सावंत. याच बरोबर काही नवीन characters सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. जसं की अंडरवर्ल्डमधील नावाजलेलं नाव म्हणजेच शकिल, त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, वगैरे वगैरे. अजून एक बदल म्हणजे दगडी चाळ मधील चंदू मामा आपल्याला माहितीच आहे. दगडी चाळ २ मध्ये चंदू मामा चा भाचा डॅडी सोबत दगडी चाळी साठी काम करताना आपल्याला पाहायला भेटेल. हा भाचा सुद्धा चंदू मामा सारखाच दाखवला आहे. काम तेच फक्त चेहरा वेगळा.
दगडी चाळच्या पहिल्या भागातील धागा-धागा गाणं आजही आपल्या ओठांवर आहे. बऱ्याचदा आपण गुणगूनत असतो. तर दुसऱ्या भागात आपल्याला धागा धागा या गण्याचं Reprise Version ऐकायला मिळेल. त्याचबरोबर, हिन्दी तमिळ अभिनेत्री डेझी शाहचं 'राघू पिंजऱ्यात आला' हे आयटम सॉंग व सांगावा आलया आणि समजून घे ना ही गाणी आहेत. मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज ने या गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे तर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील काही गाणी गायली आहेत. अमितराज आणि आदर्श शिंदे ही हिट जोडी असून सुद्धा गाणी म्हणावी तितकी सुपरहीट झाली नाही.
एकूणच दगडी चाळ २ हा चित्रपट मला दगडी चाळ ह्या पहिल्या भागाचीच कॉपी वाटला. अगदी सूर्याच्या एन्ट्रीपासून ते सूर्याचं दगडी चाळ सोडून जाणं. पुन्हा दगडी चाळीला सूर्याची गरज असते. मग डॅडी सूर्याला बोलावतात. सूर्याच्या घरचे सूर्याला अडवतात. तरीही सूर्या डॅडीला मदत करतो, वगैरे वगैरे. फक्त ह्या पार्ट चा शेवट मला पहिल्या पार्ट पेक्षा वेगळा वाटला. आणि खरंच वेगळा आहे. अनपेक्षित आहे. नुसता अनपेक्षित नाही तर इंप्रेसिव सुद्धा आहे. जबरदस्त !
तर मित्रांनो दगडी चाळ-२ पाहता मी डिसपॉइंटेड आहे. परंतु तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. कदाचित हा चित्रपट, ह्या चित्रपटाचं कथानक तुम्हाला आवडेल. आणि जरी ते नाही आवडलं तरी चित्रपटाचा शेवट नक्की आवडेल. फक्त Ending बघण्यासाठी का होईना 'दगडी चाळ - २' हा चित्रपट नक्की बघा.
धन्यवाद ! शुक्रिया ! आभार ! अँड थँक यु Friends ! तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
0 टिप्पण्या