पुस्तकाचे नाव – प्रवास जन्मोजन्मीचा (Many Lives, Many Masters)
लेखक - डॉ. ब्रायन वीज
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
वर्ग – कथासंग्रह
पृष्ठसंख्या – १६६
भाषा – मराठी
पुस्तक समीक्षण – क्षमा बीडकर
Marathi Book Review
प्रवास जन्मोजन्मीचा
Hello Friends!
तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या ब्लॉगवर मनापासून स्वागत आहे!
मित्रांनो, मी क्षमा, आज तुमच्यासोबत डॉ. ब्रायन वीज यांच 'प्रवास जन्मोजन्मीचा' हे पुस्तक मला कसं वाटलं ते शेअर करणार आहे.
अध्यात्म, मरणोत्तर जीवन, भूतकाळातील घटना, पुनर्जन्म, आणि सामूहिक जन्म यांसारख्या संकल्पनांवर आधीच विश्वास असलेल्या व्यक्तींसाठी हे पुस्तक अत्यंत वाचनिय आहे, कारण ते त्यांच्या विश्वासाची पुष्टी करते. तथापि, जे लोक तार्किक, युक्तिवाद आणि संज्ञानात्मक संकल्पनांवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना हे पुस्तक अश्या संकल्पनांवर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडते.
व्यक्तिशः, मी प्रारब्ध आणि कर्मावर विश्वास ठेवते, परंतु यापूर्वी पूर्वजन्म आणि मरणोत्तर जीवन या संकल्पनावर माझा पुरेसा विश्वास न्हवता. हे पुस्तक वाचल्यानंतर मला पूर्वजन्म आणि मरणोत्तर जीवन सुद्धा असतं यावर विश्वास बसला.
ही कथा एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आणि त्यांच्या रुग्णाची आहे. कॅथरीन या रुग्णावर १८ महिने उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ञ डॉ. ब्रायन वीज यांना प्रारंभिक पद्धतीने अपेक्षित यश प्राप्त होत नव्हते. कॅथरीनला भयानक स्वप्ने, चिंता, आणि पॅनिक अटॅक्सचा सामना करावा लागत होता. पारंपारिक उपचार पद्धतींचा वापर अयशस्वी ठरल्यावर, डॉ. वीज यांनी संमोहन (Hypnosism) उपचार पद्धतीचा अवलंब केला. यामुळे कॅथरीनला तिच्या पुनर्जन्माचे अनुभव आले आणि सद्य जन्मातील सर्व आजारांची आणि प्रश्नांची उत्तरं तिला तिच्या पूर्वजन्मातील घटनांमध्ये सापडली. हे समजल्यानंतर, डॉ. वीज आणि केथरीन यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण पूर्णपणे बदलला.
- ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील -
हे पुस्तक वाचल्यानंतर आयुष्यकडे बघण्याचा माझा सुद्धा दृष्टिकोण बदलला आणि मी एका नवीन जगात प्रवेश केल्यासारखे मला जाणवू लागले. जीवनाची वास्तविकता ओळखण्याची आणि दृष्टिकोन बदलण्याची संधी या पुस्तकातून मिळते. आपल्याला पूर्वीच्या जन्मांचे अस्तित्व मान्य करायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच वाचा.
डॉ. ब्रायन वीज यांचे आभार, ज्यांनी त्यांच्या अविस्मरणीय केसला पुस्तक रूपात प्रकाशित करून जीवनाची वास्तविकता स्पष्ट केली.
'प्रवास जन्मोजन्मीचा' हे पुस्तक फ्लिपकार्ट व ऍमेझॉन या दोन्ही Website वर Available आहे तेथून तुम्ही खरेदी करू शकता. तसेच हे पुस्तक तुम्ही सुद्धा तुमच्या 'Dear Ones' ना भेट म्हणून सुद्धा देऊ शकता.
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
धन्यवाद!
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com
0 टिप्पण्या