Jugadu Kamlesh - Shark Tank Tndia

(NOTE: Use TRANSLATOR to READ in English)

    दोन दिवसांपूर्वी मी शार्क टँक इंडियाचा एपिसोड पाहत होतो. मालेगाव येथील कमलेश हा लहान शेतकरी शार्क टँक इंडियामध्ये आपली कल्पना शार्क्ससमोर मांडण्यासाठी आला होता. तो जुगाडू कमलेश या नावाने प्रसिद्ध आहे. तर आज मी तुम्हाला या जुगाडू कमलेशबद्दल  व त्याला मिळाल्या ऑफर बद्दल सांगणार आहे. आशा आहे की या छोट्याश्या अनुभवातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल.

    जुगाडू कमलेश फक्त बारावी पास आहे. शेतीची आवड असल्याने  कमलेशने आपलं पदवीचं शिक्षण अपूर्ण सोडलं व शेती करू लागला. कमलेश रोज आपल्या वडिलांना कीटकनाशक औषधांची टॅंक खांद्यावर घेऊन पिकांवर फवारणी करताना पाहत होता. त्यामुळे वडिलांना होणारा पाठीचा त्रास, तसेच नाकातोंडात औषध गेल्यामुळे होणाऱ्या आजारांचा त्रास कमलेशच्या डोळ्याने बगवला नाही. म्हणून त्याने स्वतः वडिलांचा व देशातील इतर शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी, काही तरी 'जुगाड' करण्याचं ठरवलं. सलग सात वर्षे तो काही न काही जुगाड करत राहिला. आणि सात वर्षाच्या जुगाडा नंतर, काष्टानंतर, यश-आपयशानंतर, मागच्या वर्षी त्याने  पिकांवर औषध फवारणीसाठी सायकलचा शोध लावला. ती सायकल त्याने अशी बनवली की जी वजनाने हलकी आहे, कोणत्याही वातावरणात वापरण्यास सक्षम आहे व जीचा फक्त औषध फवारणीसाठी उपयोग न होता, पेरणी व यांसारख्या शेतीच्या अन्य कामांसाठी सुद्धा उपयोग करता येऊ शकतो. अशाप्रकारे कमलेशने मल्टी पर्पज सायकल बनवली.

    सायकल तर बनवली, पण आता ह्या सायकलला सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी (व्यवसायाच्या माध्यमाने) कामलेशला 'शार्क टॅंक इंडिया' पेक्षा दूसरा चांगला शो व संधी आहे हे जाणून कमलेश शो मध्ये आला होता. कमलेश शो मध्ये येताना खूप ऊर्जा व आशा घेऊन आला होता. त्याचे सादरीकरण अप्रतिम होते की, त्याची आपल्या शेतकरी वाडिलाबद्दल व भारतातील सर्व शेतकाऱ्यांबद्दल असलेली भावना व्यक्त करण्याची पद्धत, त्याने ज्या पद्धतीने त्याची कल्पना सर्व शार्कसमोर मांडली व भविष्यातील योजनांबद्दल त्यांना माहिती दिली, या सर्व गोष्टी पाहून सर्व शार्क भारावून गेले. पांच पैकी चार शार्कने आपल्या पर्सनल कारणांमुळे गुंतवणुकीपासून स्वतःला 'आऊट' घोषित केले. फक्त एक शार्क, पीयूष बंसल - लेन्सकार्टचे सह संस्थापक, यांनी जुगाडू कमलेशच्या कल्पनेत पैसे गुंतवण्यास रस दाखवला. पीयूषने कमलेशला व्यवसायातील ४०% भागीदारीसाथी १० लाख रुपये, व बिनव्याजी २० लाख रुपये कर्ज म्हणून देण्याची ऑफर दिली. जुगाडू कमलेशनेही पीयूषची ऑफर आनंदाने स्वीकारली.

    आजच्या जगात 20 लाखांसारखी मोठी रक्कम विनाव्याज कोणीही देत ​​नाही. आणि जर तो व्यापारी किंवा उद्योजक असेल तर बिनव्याजी रक्कम कर्ज म्हणून मिळणे आपण विसरूनच जायचं. पण पीयूषने कमलेशची जिद्द, चिकाटी, जोश, मेहनत, स्वतःवरचा विश्वास पाहून कमलेशला अशी 'दिल को छु लेनेवाली' ऑफर दिली. मित्रांनो, ऐसी ऑफर देने के लिए दिल बडा होना चाहिये हां. ज्या क्षणी मी ऑफर ऐकली त्या क्षणापासून पीयूषजी बद्दल माझ्या मनात आदर उंचावला आहे व त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोण बदलला आहे. 

Well done Piyush Bansal! खऱ्या अर्थाने पीयूषजी तरुण उद्योजकांना खरोखर प्रोत्साहन देत आहेत!

धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या