
पुस्तकाचे नाव – Few Things Left Unsaid
मूळ लेखक - सुदीप नगरकर
प्रकाशक - पेंगविन रॅनडम हाऊस इंडिया
वर्ग – काल्पनिक कथा
पृष्ठसंख्या – २९८
भाषा – इंग्लिश
Book Review
FEW THINGS LEFT UNSAID : SUDEEP NAGARKAR
Few Things Left Unsaid - हे असं पुस्तकाचं शीर्षक वाचल्या वाचल्या आपल्या मनात उत्सुकता निर्माण होते. जशी माझ्या मनात झाली तशीच तुमच्याही मनात निर्माण झाली असेल. 'काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या' या शिर्षकाप्रमाणे काय सांगायचं राहून गेलं ? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून आपण पुस्तक हातात घेतो. आणि हाताला बरंच काही लागतं. सुदीप नगरकर यांचं हे पुस्तक आपल्याला मुंबईत घेऊन जातं. मुंबई म्हणजे 'सपनो की नगरी'. ह्या स्वप्न नगरीतल्या 'आदित्य आणि रिया' या लव्ह बर्डसची ही लव्ह स्टोरी आहे. दोघेही मध्यम वर्गीय परिवरातले. शिक्षणाच्या बाबतीत आदित्य वाट चुकलेला. नाईलाजाने इंजिनेरिंगला ऍडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये त्याची रिया नावाच्या सुंदर मुलीशी ओळख होते. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर ...... तुम्हाला माहितीच असेल
(प्रेमात). प्रेम म्हंटलं की प्रपोज, डेटिंग, किसेस, टचेस, कोणा तिसऱ्याच्या येण्याने - जलीअस होणं आणि ब्रेकअप, या गोष्टी आल्याच. तशी स्टोरी टिपिकल जरी असली तरी narration मध्ये uniqueness जाणवतो.

इंग्लिश पुस्तक वाचताना मला शंका होती की आपल्याला झटपट कळणार नाही, डिक्शनरी घेऊन बसायला लागेल पण तसं काहीच झालं नाही. कारण, सुदीपजींची साधी व सोपी इंग्लिश आपल्याला कथेमध्ये गुंतवून ठेवते. शिवाय भाषा साधी व सोपी असल्याने जसं इतर मराठी पुस्तकं वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर तरळत असतो तसंच हे पुस्तक वाचताना सुद्धा झालं.
सुदीपजींची कथा सांगण्याची पद्धत मला फार आवडली. कथा जस जशी पुढे जाते तस तसं ट्विस्ट अँड टर्न्स येत राहतात आणि पुढे काय होणार याची उत्सुकता वाचकाला लागून राहते. याशिवाय प्रसंगाला अनुसरून कविता, शायरी, आणि 'तुझे देख देख सोना' या गाण्याने कथा वाचकाला आकर्षित करण्यात समर्थ ठरते. एकूणच लव्ह स्टोरीसाठी जी काही सामग्री लागते ती प्रत्येक सामग्री वापरून कथा अधिक आकर्षक केली गेली आहे. आकर्षकतेला सत्याची जोड ही आहेच. कथानक फ्लिमी जरी वाटत असलं तरी कुठेही असत्यतेचा अभाव जाणवत नाही. ज्यासाठी पुस्तक हातात घेतो - काय सांगायचं राहिलं ? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक ट्वीस्टच्या रुपात भेटतं आणि त्या अनपेक्षित ट्विस्टमुळे त्याक्षणाला आपण फक्त आणि फक्त अवाक होतो !
कथा वाचताना, प्रेमात पडलेल्यांना अरे माझ्यासोबत पण असंच झालं व न पडलेल्यांना माझ्यासोबत पण असंच होईल का असं सतत वाटत राहतं. सर्वांना आपलीच वाटणारी ही कथा आहे. ज्यांना लव्ह स्टोरीज वाचायला आवडतात त्यांनी या 'वेल कुकडं अँड डेकोरेटेड' लव्ह स्टोरीचा वाचून मनमुराद आनंद लुटा.
- ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील -
- How to Win Friends and Influence People - Dale Carnegie
- 83 Movie Review
शेवटी इतकंच सांगेन की या कथेतून शिकायला जर काही भेटलं असेल तर ते म्हणजे, 'प्रेमात पडल्यावर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत' हे शिकलो. जसं की - आपण कितीही बिझी असलो तरी 'ति'चा कॉल इग्नोर कधीच करू नये
नाही तर मग ...

पुस्तक वाचा, कळेलच तुम्हाला काय होतं ते.
वाचाल तर वाचाल ! 😉 Wish You a Happy Reading !
धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com
0 टिप्पण्या